1 minute reading time (126 words)

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह

download---2024-10-01T234858.226

 पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही, असं वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला तर आपला, जो कोणी पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मानच होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही. दीड दोन महिन्याचा विषय आहे आपलंच सरकार येणार आहे. जो कोणी पालकमंत्री होईल तो विरोधी पक्षाचा पण मान सन्मान ठेवेल. लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालवू', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची नाव न घेता अजित प...
[Maharashtra Times]पोलिसांसमोर त्याची हिंमत होते त...