2 minutes reading time (342 words)

[Lokmat]"बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची चिंता;

"बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची चिंता;

गृहमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी"

बारामती : माळेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र हल्ला तसेच सुपेजवळील बाबुर्डी आणि शेरेवाडी येथे दोन महिलांच्या झालेल्या हत्येची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बारामती तालुक्यातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी याबाबत समाजमाध्यमावर पोस्ट करून बारामती तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. तालुक्यात गेल्या काही काळात मारहाण, दहशत निर्माण करणे, प्राणघातक हल्ले तसेच रक्तपाताच्या घटना घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माळेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर सुपेजवळील बाबुर्डी आणि शेरेवाडी येथे दोन महिलांची झोपेत असताना गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडली. सलग घडलेल्या या घटनांमुळे बारामती तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरजगुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त, प्रतिबंधात्मक कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना वाढवाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यास नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.", 

...

बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची चिंता; गृहमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी Pune Marathi News | Supriya Sule concerned about increasing crime in Baramati; Demands strict action from Home Minister | Latest Pune News at Lokmat.com

Supriya Sule concerned about increasing crime in Baramati; Demands strict action from Home Minister. खासदार सुळे यांनी याबाबत समाजमाध्यमावर पोस्ट करून बारामती तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. | Pune Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Pune news in Marathi at Lokmat.com
[Sakal]दुष्काळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, ...
[TV9 Marathi]ते काही तरी नवनवीन… रोहित पवारांवर अर...