1 minute reading time (289 words)

[Edu Varta]महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

 पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केलेल्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)यांनी भेट दिली.सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीसाठी वाडिया कॉलेज (Wadia College)समोर केलेल्या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

वाडिया कॉलेज विध्यार्थी हित कृती समिती पुणे शहर या संघटनेच्या वतीने कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या परिसरातील नामांकित महाविद्यालयातील मुलीवर बलात्कार झाल्याच्या अनुषंगाने विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येत वाडिया कॉलेज समोर तीव्र निदर्शने केली.अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा.तसेच बेजबाबदार पदाधिकारी यांची संस्थेमधून कायमस्वरूपी हकालपट्टी करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थिनींना सुरक्षितता पुरविण्यास असमर्थ ठरल्याने तसेच त्यांनी तपास यंत्रणेस योग्य माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने तपासास योग्य दिशा मिळत नसल्यास तेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे,अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पदाधिकारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल न झाल्यास महाविद्यालय बंद करण्यात , येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार रवींद्र धगेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे, पुणे शहर काँग्रेसचे सचिव राहुल तायडे, विद्यार्थी विकास मंच अध्यक्ष सुरेश खुरपे, अनिल शेवरे, आरपीआयचे महीपाल वाघमारे, शैलेश चव्हाण, नगरसेविका हेमालीताई कांबळे, रिपब्लिकन कामगार सेना अध्यक्ष युवराज बनसोडे, भिम छावाचे शाम गायकवाड,सॅम जमादार,मनसेचे श्रीनिवास दिसले, केशव शिंदे,काँग्रेस कामगार सेनेचे आसिफ खान, फैय्याज शेख, रिपब्लिकन विध्यार्थी सेना जिल्हा प्रमुख विशाल म्हस्के, कमलेश चाबुकस्वार,नितीन रोकडे,इत्यादी उपस्थित होते. 

...

महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक - Eduvarta- News Portal

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे पदाधिकारी यांच्यावरत गुन्हा दाखल करावा.
[TV9 Marathi]‘आमचं आयुष्य उध्वस्त करून ते…’
[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच...