1 minute reading time
(99 words)
[TV9 Marathi]शरद पवार दादांना धक्का देणार! दौंड मधील दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला
नुसते हातात पिस्तूल घेऊन त्याचे फाेटाे पाेस्टरवर छापून काही हाेत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात मागील आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली हाेती. तर गुरुवारी बाेपदेव घाटामध्ये गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर खासदार सुळे आक्रमक झाल्या असून हा नेतृत्वाचा दोष असून महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री हे अपयशी असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

