1 minute reading time
(71 words)
[News18 Lokmat]विरोधक पवारांकडे अपेक्षेने पाहतात, सुळे असं का म्हणाल्या?
शरद पवारांच्या नेतृत्त्वावर आमचा विश्वास आहेच, पण, काही विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने पाहतात. यामध्येच सर्व काही आहे. पक्षात अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात,अस पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. "केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बोलतात. आमच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे वकील आमचेच आहेत. क्लायंट कधी कोर्टात दिसत नाही. अदृश्य शक्ती यंत्रणा चालवते" असंही पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

