1 minute reading time
(53 words)
[Rashtriya Lokrajya News]बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज-खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गावर अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनेची आवश्यकता असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. खासदार सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चादेखील केली आहे.

