1 minute reading time
(80 words)
[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही...सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याआधी राज्यात मविआची सत्ता आली आणि संधी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री या पदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुचवले जाईल अशी चर्चा होती. पण मविआच्या जागावाटपाचे सूत्र जाहीर होण्याआधीच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे जाहीर केले. आता मविआतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

