2 minutes reading time (331 words)

[Maharashtra Times]पोलिसांसमोर त्याची हिंमत होते तरी कशी?

पोलिसांसमोर त्याची हिंमत होते तरी कशी?

गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

 बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''त्या नराधमाला फाशी मिळावी अशी माझी मागणी होती. त्याला भर चौकात सर्वांसमोर फाशी द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र कालची घटना घडली त्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. त्याचा मृत्यू झाला ही वेगळी घटना आहे. मात्र गुन्हेगार हात बांधलेले असताना गोळी चालवतोच कसा ? एवढ्या पोलिसांसमोर त्याची हिंमत होते कशी ? सुदैवाने यामध्ये पोलिसाला गंभीर दुखापत झाली नसली तरी हे खूप गंभीर आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बारामती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, हा देश संविधानाने चालतो. काल जी घटना झाली त्याची चौकशी झाली पाहिजे, मला पोलिसांची काळजी वाटते. त्याचे दोन्ही हात बांधले आहेत तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला. याचे उत्तर गृहमंत्री यांनी द्यावे, तसेच या घटनेतून असे समोर येत आहे की,आज राज्यातील पोलीस सुरक्षित नाही.आमची मागणी फाशीची होती. एखाद्या पोलिसांवर हल्ला होतो, ही यंत्रणा करते काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. महिला अत्याचारासारख्या अत्यंत घाणेरडे कृत्य करणारा विरोधात जलद गती न्यायालयात केस चालवून अशा नराधमांना भर चौकात सर्वांसमोर फाशी द्यायला पाहिजे. अशी माझी सरकारकडे आजही मागणी आहे. असे ही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आला आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे.

...

Akshay Shinde Encounter : पोलिसांसमोर त्याची हिंमत होते तरी कशी? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल | supriya sule has criticized home minister devendra fadnavis | maharashtra times

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह
[TV9 Marathi]आम्ही जो निधी मागतो त्यावर…; सुप्रिया...