[Navarashtra]“…त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”
पुण्यातून खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
पुणे: नुसते हातात पिस्तूल घेऊन त्याचे फाेटाे पाेस्टरवर छापून काही हाेत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात मागील आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली हाेती. तर गुरुवारी बाेपदेव घाटामध्ये गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर खासदार सुळे आक्रमक झाल्या असून हा नेतृत्वाचा दोष असून महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री हे अपयशी असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे दाैऱ्यावर असलेल्या सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. यात पोलिसांचा दोष नाही तर नेतृत्व अपयशी ठरले आहे. त्यामुळे वेळीच गुन्हे दाखल होत नाहीत. हातात बंदूक घेऊन पोस्टर छापत आहेत. राज्याच्या महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत यांना काहीही देणेघेणे नसून हे फक्त एन्काऊंटरचे श्रेय घेत आहेत. पण एन्काऊंटर करूनही प्रश्न सुटत नाहीये, असेही त्या म्हणाल्या.
पुणे दाैऱ्यावर असलेल्या सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. यात पोलिसांचा दोष नाही तर नेतृत्व अपयशी ठरले आहे. महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री हे अपयशी असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी सुळे म्हणाल्या, की पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबे यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते. मात्र आमचे संबंध कायम होते. आत्ता ते परत घरी येत आहेत त्याचे समाधान असून त्यांचे स्वागत अाहे.

