1 minute reading time (83 words)

[ABP MAJHA]अतिथी देवो भव:, आम्ही अदृश्य शक्तीवाले नाहीत,आम्ही संविधानवाले

अतिथी देवो भव:, आम्ही अदृश्य शक्तीवाले नाहीत,आम्ही संविधानवाले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, अतिथी देवो भव म्हणून पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे. आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही, तर आम्ही संविधानवाले आहोत. संविधान केंद्रबिंदू ठेवून आम्ही राजकारण करतो आणि सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. 

[Saam TV]वाडिया कॉलेजबाहेर काँग्रेसचं आंदोलन लाईव्...
[TV9 Marathi]ट्रीपल इंजिनचं सरकार आल्यापासून महिला...