[Saam TV]ट्रॅफिकमध्ये कार अडकली, खासदार सुप्रिया सुळेंनी केली बाईकवारी
VIDEO होतोय व्हायरल
सोशल मीडियावर आपल्याला कायम पुणे शहरातील अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. गेल्या काही दिवसांपासून पुणे एकाच गोष्टीमुळे चर्चेत येत आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी. अनेक महिन्यांपासून पुण्यातील नागरिकांना दररोज वाहतुक कोंडीची भयंकर समस्या सतावत आहे. मात्र काही गेल्या यावर उपाय निघत नाही. मात्र याच वाहतूक कोंडीचा सामना थेट खासदार सुप्रिया सुळे यांनीही करावा लागला आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी खासदार सुप्रिया सुळे तब्बल १तास हून अधिक काळ अडकून होत्या मात्र त्यांनी ताफा सोडून देत चक्क दुचाकीने प्रवास केला आहे. सध्या खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत खासदार सुप्रिया सुळे सुरुवातीस दिसतात. व्हिडिओच्या सुरुवातीस सुप्रिय सुळे म्हणतात की, ''नमस्कार गेले दीड तास मी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. शेवटी यांची मदत घेतली आहे मी''. त्यानंतर ज्या व्यक्तीची मदत त्यांनी घेतली त्याचे नाव विचारत आहे. त्यानंतर यांची मदत घेऊन मी माझ्या पुढच्या मिंटिगाला जात आहे. शिवाय त्या बाईक (Bike)चालवणाऱ्या व्यक्तीला त्या धन्यवाद करतात. मग व्हिडिओची दुसरी बाजू ऑपन करत पुण्याच्या रस्त्यावर असलेली ट्रॅफिक दाखवत आहेत.
व्हिडिओच्या शेवटी खासदार सुप्रिया सुळे या म्हणताता की,'' माझी प्रशासनाला विनंती आहे, ट्रॅफिकच काही तरी करा. सर्वच नागरिक तासनतास या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत, प्लिझ काही तरी मार्ग काढा''. व्हिडिओच्या पुढे दिसेल की काही सामान्य नागरिक सुप्रिया सुळेंना पाहून नमस्कार करतात त्यानंतर त्यांच्याशी बाईकवरुनच संवाद साधतात.
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आलेला आहे. १४ तासांपू्र्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओला तब्बल ४ हजारहुन अधिक नेटकऱ्यांनी पंसती दिलेली आहे तर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

