1 minute reading time (137 words)

[LS Marathi]'राम मंदिरात कथित भ्रष्टाचार, चौकशी करुन दोषींना फाशी द्यावी'

'राम मंदिरात कथित भ्रष्टाचार, चौकशी करुन दोषींना फाशी द्यावी'

अयोध्या ते उज्जैन या आमच्यासाठी आस्थेच्या श्रद्धेच्या जागा आहेत. तिथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, हे लक्षात घेता आमच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांची अयोध्येला जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत परवानगी मागत आहेत. त्यासाठी त्यांना परवानगी सुद्धा दिली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. राम मंदिरासाठी भाजपाच्या एका पिढीने मोठा लढा उभा केला होता. आज त्यांना काय वाटत असेल? सुषमा स्वराज यांची आठवण काढत खासदार सुळे म्हणाल्या, 'सुषमाजी, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या पण आज कोणती मर्यादा या सरकारने ठेवली आहे. त्याच रामाच्या मंदिरात भ्रष्टाचार होत आहे. हा आमच्या श्रद्धेच्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार असून आम्ही तो सहन करणार नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या समोर भ्रष्टाचार मोकळेपणाने सुरू होता, हे दुर्दैवी आहे. यासाठी अडवाणी आणि अटलजींनी संघर्ष केला नव्हता'. अयोध्येतील भ्रष्टाचाराचा मुद्दा आपण संसदेत उपस्थित करणार आहोत, असे सांगत भाजपला याचे उत्तर भाजपाला द्यावेच लागेल, असे सुळे यांनी यावेळी सुनावले. 

[News Uncut]"एका पावसात महाराष्ट्र ठप्प!" | सुप्रि...
[TV9 Marathi]'सरकारला सामान्याच्या जीवाची किंमत ना...