1 minute reading time
(73 words)
[Times Now Marathi]निधी वितरणातील भेदभावाबाबत राज्य सरकार विरोधात आंदोलन
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यांना निधीतून वगळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत.

