1 minute reading time (107 words)

[Saam TV]PMनिवासाबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनात Supriya Sule सहभागी

PMनिवासाबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनात Supriya Sule सहभागी

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झालं आहे. काल झालेल्या लाठीचार्जनंतरही आज मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक जंतर-मंतरवर दाखल झाले आहेत. CJPच्या समर्थनासाठी तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळत असून, सरकारविरोधात घोषणाबाजी आणि लाठीचार्जच्या कारवाईचा निषेध केला जात आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, CJPचे अभिजीत दिपके यांनी केंद्रातील मंत्र्यांनी स्वतः जंतर-मंतरवर येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. कालपेक्षा आज अधिक विद्यार्थी दिल्लीत दाखल होतील, असा दावा आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी केला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध आणि सरकारसोबत संवादाची मागणी यामुळे आंदोलन आणखी चर्चेत आले आहे. 

[ABP MAJHA]शरद पवार-सुप्रिया सुळे जंतर मंतरवर, विद...
[News 24]NCP-SCP MP Supriya Sule arrives at Jantar...