1 minute reading time (258 words)

[Saam TV]बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशभरात सध्या एसआयआर मोहिमेविरोधात राजकीय रान पेटलंय . दिल्लीत राहुल गांधी, मुंबईत ठाकरेंनंतर. आता बारामतीतून खा. सुप्रिया सुळे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढलेत. विशेष म्हणजे, स्वतः दीड लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊनही, सुळेंनी निवडणूकीतील मतदारांचे आकडे मांडून बारामतीतला व्होटचोरीचा मुद्दा उचललाय. सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलं पाहा.


बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सात लाख मतदार अचानक कमी झाल्याचा त्यांनी आरोप केला. बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अडीच लाख मतदार कमी झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात 50 हजार मतदार वाढले तर निवडणुकीनंतर या मतदारसंघ पुन्हा अडीच लाखांनी मतदार कमी कसे झाले असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय..सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ .

सुप्रिया सुळेंनी ही आकडेवारी चव्हाट्यावर आणून, निवडणूक आयोगाविरोधात देशभरात पेटलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या यज्ञात जणू काही समिधाच टाकल्यायेत! एसआयआरच्या माध्यमातून तब्बल १३ कोटी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यात आता थेट निवडून आलेल्या खासदारानेच आयोगाचा हा कारभार पुराव्यानिशी समोर आणलाय. त्यामुळे आता याची चौकशी होणार का याकडे लक्ष लागलंय.

...

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ | Maharashtra Politics Supriya Sule Claim on Baramati Voter List Sparks Debate 7 Lakh Voters Missing in Baramati bbj88 |Saam tv

SIR Controversy: आता बातमी आहे SIR मधील आणखी एका घोळाची, देशभरात SIR विरोधात राजकारण तापलेलं असताना आणखी एक घोळ समोर आलाय. राज्यातील एका खासदारानं आपल्या मतदारसंघातून तब्बल 7 लाख मतदार गायब झाल्याचा दावा केलाय. नेमका हा दावा कुणी केलाय? कोणत्या मतदारसंघात हा घोळ झालाय? पाहूयात या रिपोर्टमधून.
[Maharashtra Desha]२,५०,००० मतदार गेले कुठे? बाराम...
[Zee 24 Taas]मतचोरीविरोधात इंडिया आघाडीची एकजूट पा...