[]हा दिवस कोणत्याही बहिणीवर येऊ नये, सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेला काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पुणे : बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी भाषण करताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन बारामतीकरांना केले. यावेळी, त्या भावूक झालेल्यादेखील दिसून आल्या. महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभा असले, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
"आपला भाऊ आपल्यात नाही, हे आयुष्यभर आपल्या मनात राहत. हा कार्यक्रम दुःखाचा आहे, सुनेत्रा वाहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्यावर अचानक पडलेली जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. महाविकासआघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोठ्या ताकदीने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे," असा शब्द खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिला. "शरद पवार हे गेली 6 दशके बारामतीत कार्यरत आहेत. अजित पवार यांनी पूर्ण निष्ठेने 35 वर्ष बारामतीकरांची सेवा केली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती. म्हणूनच निवडणूक जाहीर होताच, पहिल्या दिवशी आम्ही कोणताही उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले होते. पण, अर्थात असे झाले नाही. पण आता जे मतदान होईल, त्यामध्ये विक्रमी मतदान होईल यामध्ये शंका नाही," असे म्हणत त्यांनी मोठा विश्वास व्यक्त केला.
पार्थचा फोन आला अन्…
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा दिवस किंवा ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊन नये," असे म्हणत त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. "सकाळी 5 वाजता पार्थचा फोन आला. तो म्हणाला डॅडींचे विमान पडले आहे. माझा विश्वासच बसत नव्हता. आजही डोळे बंद केले की तो प्रसंग समोर येतो. मला वाटत होते दादा विमानात नसेलच, आणि असला तरी तो सुखरूप चालत बाहेर येईल. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आज तो कर्ता पुरुष आपल्यात नाही, हे दुःख आयुष्यभर काळजात राहणार आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "या देशात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान बारामतीकरांमुळे साहेबांना मिळणार आहे. हीच परंपरा दादांनी पुढे चालवली. आता ही जबाबदारी वहिनींवर आणि पार्थ-जयवर आली आहे." असे म्हणत त्यांनी प्रोत्साहन दिले.

