1 minute reading time
(74 words)
[ABP MAJHA]सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण
बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी भाषण करताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन बारामतीकरांना केले. यावेळी, त्या भावूक झालेल्यादेखील दिसून आल्या. महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभा असले, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

