1 minute reading time (85 words)

[Times Now Marathi]बारामतीहून सुप्रिया सुळे Live

बारामतीहून सुप्रिया सुळे Live

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ… या मतदारसंघातील लढतीची देशभरात चर्चा झाली. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत झाली. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. नणंद-भावजय ही लढाई तुमच्या लोकांसाठी असेल. पण माझ्यासाठी ही लढाई इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढाई होती. मी वैयक्तिक व्यक्तीशी आयुष्यात कधीच लढत नाही. मी सर्व जनतेचे आभार मानते. लोकांनी दिलेला हा जो कल होता तो भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात आहे. एनडीएच्या विरोधात आहे. हे दिसत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[Lokshahi Marathi]शेतकरी मेळाव्यातून सुप्रिया सुळे...
[News18 Lokmat]बारामतीचा दादा बदलणार? ताईंचा इशारा...