1 minute reading time (86 words)

[TV9 Marathi]'दादाना आदरांजली वहिनींना साथ द्या'

'दादाना आदरांजली वहिनींना साथ द्या'

"गेले अडीच महिने आपल्या सगळ्यांसाठी फार कठीण गेले. आजही विश्वास बसत नाही की दादा ( अजित पवार ) आपल्यात नाहीत. पण दादांची स्वप्नं पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. यावेळी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेसाठी सुप्रिया सुळे बारामतीत पोहोचल्या होत्या. व्यासपीठावर बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं . दादांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने संपूर्ण सभेत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. 

[Times Now Marathi]प्रचाराची सांगता सभा, सुप्रिया ...
[Maharashtra Times]अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची ...