1 minute reading time
(84 words)
[TV9 Marathi]एकाच माणसाला हा मतदारसंघ कळतो ते म्हणजे शरद पवार - सुळे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं आपण पाहिलं. एनडीएने निवडणूक जिंकली असली तरी इंडिया आघाडीने देशभरात २३४ जागा जिंकत त्यांची ताकद दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीला (एनडीए) धोबीपछाड दिला आहे. तसेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या. बारामतीची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंगजंग पछाडलं होतं. मात्र शरद पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

