1 minute reading time (138 words)

[TV9 Marathi]दिल्लीत पण सरकार बदलू शकतं काहीही होवू शकतं पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे

दिल्लीत पण सरकार बदलू शकतं काहीही होवू शकतं पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ऑक्टोबरमध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यावर 26 जानेवारीला महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणारा चित्ररथ आपण करू, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. 2014 साली बारामतीमध्ये झालेल्या धनगर आरक्षणाच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'एक गृहस्थ 2014 साली घराबाहेर येऊन म्हटले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ. मी शरद पवारांना म्हटलं ते जर म्हणतात की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ शकतात तर आपण शेवटच्या कॅबिनेटमध्ये का नाही देऊ शकत? पवार साहेब म्हणाले की ते जे म्हणतात त्यात तथ्य नाही आणि तेवढा वेळही आपल्याकडे नाही. पण अजून काही झालं नाही', असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 

[Navshakti]सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर
[News18marathi]'दिल्लीतही सरकार बदलू शकतं; पण...'